गुनाहो का अंत....!

संपादक अमित वांद्रे यांची पोलीसांकडे तक्रार; व्हॉट्सएपवर भ्रामक पोस्टर व्हायरल करून केली बदनामी

संपादक अमित वांद्रे यांची पोलीसांकडे तक्रार; व्हॉट्सएपवर भ्रामक पोस्टर व्हायरल करून केली बदनामी

क्राईम ऑपरेशन न्यूज़-४ नोव्हेंबर २०२५
क्राईम प्रतिनिधि,

नागपूर समाचार 24 या डिजिटल न्यूज पोर्टलचे संपादक अमित वांद्रे यांनी वेदप्रकाश आर्य या व्यक्तीविरुद्ध सीताबार्डी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, त्यांनी आपल्या विरोधात व्हॉट्सएपवर भ्रामक आणि बदनामीकारक पोस्टर व्हायरल केल्याचा आरोप केला आहे.


अर्जदार अमित वांद्रे यांनी दिलेल्या निवेदनानुसार, २४ ऑक्टोबर २०२५ रोजी नारा येथील प्रस्तावित पार्कविषयी त्यांनी कागदोपत्री पुराव्यांच्या आधारे एक बातमी प्रसिद्ध केली होती. या बातमीत जमीन मालक सुरेश सुरी यांनी “आर्या” आडनावाच्या व्यक्तीने दोन एकर जागेची मागणी केली असल्याचा आरोप केला होता, मात्र कोणत्याही व्यक्तीचे पूर्ण नाव, छायाचित्र किंवा ओळख उघड करण्यात आलेली नव्हती.

तरीही, संबंधित बातमी स्वतःच्या विरोधात असल्याचे समजून वेद प्रकाश आर्य यांनी माझी बदनामी केली असल्याचा आरोप ठेवून जरीपटका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली, असे अमित वांद्रे यांनी आपल्या तक्रारीत नमूद केले आहे.

तसेच, त्यांनी सांगितले की, आर्य यांनी त्यांच्या विरोधात व्हॉट्सअप ग्रुप्सवर भ्रामक पोस्टर व्हायरल केले, ज्यामध्ये त्यांचा फोटो, न्यूज पोर्टलचे नाव आणि “बदनामीकारक मजकूर” असलेली बनावट सामग्री वापरली गेली. ती पोस्ट आंदोलन ग्रुप वर पोस्ट केली.

अमित वांद्रे यांनी या प्रकरणात नमूद केले आहे की, “या कृतीमुळे माझी सामाजिक आणि व्यावसायिक प्रतिष्ठा धोक्यात आली असून, पत्रकारितेच्या स्वातंत्र्यावर दबाव निर्माण केला .” तसेच, संबंधित व्यक्तीने पोलीस तक्रार आणि सोशल मीडिया दबावाद्वारे पत्रकारांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केल्याचा त्यांचा आरोप वांद्रे यांनी आहे. बदनामी करणाऱ्यावर कारवाही ची मागणी अमित वांद्रे यांनी केली.

..यावेळी डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल संघांचे अध्यक्ष संतोष गायकवाड, महासचिव विजय खवसे, कोश्याध्यक्ष अमित वांद्रे, शैलेश गडपायले उपस्थित होते. डिजिटल मीडियाचा आवाज दाबणाऱ्यावर कारवाईची मागणी करण्यात आली.