वाडीतील तडीपार गुंडांची दहशत! पोलिसांच्या नाकाखाली खुलेआम फिरत आहेत गुन्हेगार ! निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाढतोय अस्थिरतेचा धोका!
(क्राईम ऑपरेशन – 11 नोव्हेंबर 2025)
क्राइम प्रतिनिधि, नागपूर
वाडी ,नागपुर – वाडी पोलिस ठाण्याच्या कार्यक्षमतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. तडीपार गुन्हेगारांवर कारवाई केली असतानाही, अनेक आरोपी आजही शहरात खुलेआम फिरताना दिसत आहेत. स्थानिक नागरिकांमध्ये त्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वाडी पोलिसांनी आतापर्यंत सुमारे 36 गुन्हेगारांना तडीपार केले होते. त्यापैकी सात जणांना न्यायालयाने दिलासा देत तडीपारी आदेश रद्द केले असले तरी, उर्वरित गुन्हेगारांपैकी अनेक आजही शहरात सक्रिय आहेत. काही जण सट्टा, दारू, ड्रग्ज आणि गांजा विक्रीसारख्या अवैध धंद्यांत गुंतलेले असल्याचे समोर आले आहे.
इतकेच नव्हे, तर काही तडीपार गुन्हेगार मीडियासमोर विधान देताना आणि सार्वजनिक कार्यक्रमांमध्येही दिसून येतात – ज्यावरून पोलिसांच्या कारवाईवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित होते.
या संदर्भात डीबी इंचार्ज पीएसआय अमित बंडगर यांनी सांगितले की, “कलम 142 अंतर्गत अनेक तडीपारांवर कारवाई केली आहे. जर क्षेत्रात तडीपार दिसला तर आम्ही तत्काळ कारवाई करतो. आमची त्यांच्यावर कडक नजर आहे.”
मात्र, नागरिकांचे म्हणणे आहे की वरिष्ठ अधिकारी आणि डीसीपी स्तरावरही या प्रकरणाची माहिती असूनही ठोस कारवाई होत नाही. आगामी वाडी नगर परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या गुन्हेगारांची वाढती सक्रियता कायदा-सुव्यवस्थेसाठी गंभीर धोका ठरू शकते.
जर पोलिसांनी तातडीने कारवाई केली नाही, तर वाडीतील शांतता आणि सुरक्षिततेवर मोठे संकट ओढवू शकते. अखेर या परिस्थितीला वाडी पोलिस ठाण्याचे पीआय जवाबदार राहणार हे निश्चित आहे,
