गुनाहो का अंत....!

दलित दांपत्याला घराबाहेर हाकलण्याचा कट! -गिट्टीखदान पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह! -कोर्टाच्या आदेशावर घर सील करण्यासाठी आलेले बँकेचे कर्मचारी ज्वाला धोटे यांनी परत केल

  • दलित दांपत्याला घराबाहेर हाकलण्याचा कट! -गिट्टीखदान पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह!
    कोर्टाच्या आदेशावर घर सील करण्यासाठी आलेले बँकेचे कर्मचारी ज्वाला धोटे यांनी परत केल

क्राइम ऑपरेशन १२ नोहेम्बर २५

-मुख्यमंत्री यांच्या शहरात दलिताचे घर हडपण्याचा डाव!

नागपुरदलित दांपत्याला त्यांच्या स्वतःच्या घरातून बेदखल करण्याचा गंभीर कट रचला गेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हा केवळ फसवणूक व जाळसाजीचा प्रकार नसून, गिट्टीखदान पोलिसांच्या निष्क्रियते मुळे दलिताचे घर हळपण्याचा डाव साधला. वेळीच पोलीसांनी चौकशी करून आरोपीला अटक केले असते तर धोखाधडी करणारे सामोर आले असते.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शहरात दलितांचे घर हडपण्याचा मोठा कट रचल्या गेला असतांना पोलिसांनी मात्र या प्रकरणी गंभीर तेने कार्यवाही न केल्याने दलितावर उघड्यावर राहण्याची वेळे आली.

२००१ पासून राहतात गजभिये परिवार स्वतःच्या घरात


दाभा येथील गणेश नगर परिसरात राहणाऱ्या पूर्णिमा गजभिए या आपल्या कुटुंबासह २००१ पासून प्लॉट क्र. ५८ वर असलेल्या घरात वास्तव्य करीत आहेत. हे घर त्यांच्या नावावर नोंदणीकृत आहे. आर्थिक अडचणीमुळे पूर्णिमा यांना सुमारे तीन लाख रुपयांच्या कर्जाची गरज होती. त्यावेळी वर्षा भेडे आणि सारंग भेडे या दोघांनी मदतीचे आश्वासन देत त्यांना फसवणुकीच्या जाळ्यात ओढले.
कर्जाच्या बहाण्याने घेतले घराचे कागदपत्र!
कर्ज प्रक्रियेच्या नावाखाली आरोपींनी गजभिए यांच्या सर्व कागदपत्रांसह घराची मूळ रजिस्ट्री आपल्या ताब्यात घेतली. दरम्यान, गोपाल नगर येथील राजेंद्र दियेवार यांनाही कर्जाची गरज होती. आरोपींनी चातुर्याने गजभिए यांच्या नावावरील मालमत्ता दियेवार यांच्या नावावर ट्रान्सफर करून घेतली. त्यावर दियेवार यांच्या नावाने 18 लाख लोन घेतले.मात्र, या व्यवहाराची माहिती स्वतः दियेवार यांनाही नव्हती.
१८ लाखांचे कर्ज – पैसे उचलून आरोपी फरार!
बँकेच्या नोंदीप्रमाणे, १८ लाख रुपयांचे कर्ज राजेंद्र दियेवार यांच्या नावाने मंजूर झाले. मात्र, ते पैसे वर्षा भेडे आणि सारंग भेडे यांनी बँकेतून उचलले आणि फरार झाले. फसवणुकीचा प्रकार लक्षात येताच गजभिए यांनी गिट्टीखदान पोलिस ठाण्यात तक्रार देण्याचा प्रयत्न केला. परंतु,गिट्टीखदान पोलीस स्टेशनचे पीएसआय राठोड यांनी तक्रार नोंदवण्यास नकार दिला आणि त्यांना वारंवार टाळाटाळ केली.जेव्हा सामाजिक कार्यकर्त्या ज्वाला धोटे यांनी या प्रकरणात लक्ष दिले तेव्हा पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
गिट्टीखदान पोलिसांची निष्क्रियता उघड!
पूर्णिमा गजभिए यांनी २६ जुलै २०२५ रोजी लेखी तक्रार दिली होती. या प्रकरणात कलम ३१६(२) आणि ३१८ अंतर्गत गुन्हा नोंदवला गेला. मात्र, बराच काळ उलटूनही आरोपी फरारच आहेत. पोलिसांची निष्क्रियता पाहून नागरिकांमध्ये संताप उसळला आहे.
घर सील करण्यास बँक कर्मचारी पोहोचले,ज्वाला धोटे यांच्या मध्यस्थीतिने परत गेले. काही काळ वाढला होता तणाव
११ नोव्हेंबर रोजी होम फर्स्ट फायनान्स कंपनीचे अधिकारी, वकील आणि पोलिस दल घर सील करण्यासाठी आले. याची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्त्या ज्वाला धोटे घटनास्थळी पोहोचल्या आणि पोलिस व बँक अधिकाऱ्यांशी संवाद साधून कारवाई थांबवली. त्यांच्या प्रयत्नानंतर बँकेने अखेर ३० दिवसांचा अंतिम नोटीस देण्याचा निर्णय घेतला.
तणावामुळे मुलाने केला आत्महत्येचा प्रयत्न

या प्रकारामुळे पूर्णिमा गजभिए यांचा मुलगा रंजीत गजभिए याने पूर्वी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. ११ नोव्हेंबर रोजी पुन्हा घर सील होणार असल्याने त्याची प्रकृती बिघडली, त्यामुळे पोलिसांनी त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.

न्यायासाठी गजभिए यांची मागणी
स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी मागणी केली आहे की वर्षा भेडे, सारंग भेडे आणि या फसवणुकीत सहभागी सर्वांना त्वरित अटक करण्यात यावी. तसेच गिट्टीखदान पोलिसांच्या निष्क्रियतेची चौकशी करून कारवाई व्हावी.
ज्वाला धोटे म्हणाल्या —


“हा केवळ एका दलित कुटुंबाचा प्रश्न नाही, तर न्यायव्यवस्था आणि दलित समाजाच्या हक्कांचा प्रश्न आहे. अशा प्रकरणांत पोलिसांनी कार्यवाहीचे पाऊल उचलले नाही हे सर्वात मोठे अपराध आहे,” असे मत सामाजिक कार्यकर्त्या ज्वाला धोटे यांनी व्यक्त केले.
पीडित राजेंद्र दियेवार म्हणाले 
“या घराशी माझा काहीही संबंध नाही. माझ्या नावाने रजिस्ट्री कशी केली, लोन कसे झाले याची मला माहितीही नाही. मी स्वतः वर्षा भेडे यांच्या विरोधात तक्रार करण्यासाठी गिट्टीखदान पोलिस ठाण्यात जाणार आहे,” पोलिसांनी माझी तक्रार नोंदवावी व दोषीवर कार्यवाही करावी, माझे नावाने घेतलेले 18 लाख लोन त्यांच्या कडून वसूल करावे असे त्यांनी सांगितले.