*राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई*
*गोंडवाना पिंपरी येथे बनावट दारूचा कारखाना उद्ध्वस्त*
*क्राइम ऑपरेशन | 13 जानेवारी 2026*
*क्राइम ऑपरेशन ब्युरो*
नागपूर, दि. 13 — राज्य उत्पादन शुल्क नागपूर विभागाने गोंडवाना पिंपरी (हिंगणा) परिसरात मोठी कारवाई करत बनावट देशी-विदेशी दारू तयार करणाऱ्या कारखान्यावर छापा टाकून टाळे ठोकले. माय टाऊन सोसायटी, सेक्टर-8 मधील बंगलो क्रमांक 133 येथे सुरू असलेला हा बेकायदेशीर उद्योग उद्ध्वस्त करण्यात आला.
विभागीय उपायुक्त *गणेश पाटील* व जिल्हा अधीक्षक *सुरज कुमार रामोड* यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय भरारी पथकाने ही धडक कारवाई केली. छाप्यातून *१ हजार ९० लिटर बनावट देशी दारूचा ब्लेंड,* महाराष्ट्रात विक्रीस प्रतिबंधित असलेल्या *गोवा व्हिस्कीच्या ३५६ बाटल्या, ९० बिएल बनावट देशी दारू,* इलेक्ट्रॉनिक बॉटल सीलिंग मशीन, बनावट लेबल्स, झाकणं, रिकाम्या बाटल्या तसेच चारचाकी वाहन असा *एकूण २४ लाख ६७ हजार ७०४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.*
या प्रकरणी *गुन्हा क्रमांक 19/2026* अन्वये
फरार मुख्य आरोपी *शुभम गोविंद तिवारी (31)* याच्यासह
*गोविंद रामदत्त तिवारी (59),* *शैलेंद्र धुर्वे (24),* *रघुनाथ उईके (21), राजकुमार उईके (25),* *द्वारका शिवलाल इनवाती (45) व प्रमोद नथ्थुजी सयाम (42)* यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई निरीक्षक *दशरथ क्षीरसागर,* दुय्यम निरीक्षक *जगदीश पवार, लांबाडे,* निरीक्षक *बालाजी चाळणेवार,* दुय्यम निरीक्षक *वैभव दीवाण,* *अमित क्षीरसागर, शुभम ढोके* यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. जवान *राहुल सपकाळ, गजानन राठोड, सुधीर मानकर, किरण वैद्य, सचिन आडोळे, विनोद डुंबरे* यांनी मोलाचे सहकार्य केले. पुढील तपास दुय्यम निरीक्षक *जगदीश पवार* करीत आहेत.
अवैध मद्यनिर्मिती, विक्री किंवा वाहतुकीबाबत माहिती असल्यास नागरिकांनी *टोल-फ्री क्रमांक 18002339999 किंवा व्हॉट्सॲप 8422001133* वर संपर्क साधावा, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाने केले आहे.
