गुनाहो का अंत....!

गडचिरोली पोलीस दलातील 31 पोलीस अधिकारी व अंमलदार यांना मा. राष्ट्रपती यांचे “पोलीस शौर्य पदक” जाहिर

गडचिरोली पोलीस दलातील 31 पोलीस अधिकारी व अंमलदार यांना मा. राष्ट्रपती यांचे “पोलीस शौर्य पदक” जाहिर

क्राइम ऑपरेशन-, 26 जनवरी 26
क्राइम ऑपरेशन ब्युरो

• सन 2018 साली झालेल्या बोरीया-कसनासूर चकमकीत बजावली होती शौर्यपूर्ण कामगिरी
• प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला गडचिरोली पोलीस दलातील एकूण 394 पोलीस अंमलदारांना मिळाली पदोन्नती तसेच एकूण 10 शहीद अंमलदारांना देखील मिळाली पदोन्नती

देशभरामध्ये पोलीस दलात किंवा इतर सशस्त्र दलात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या पोलीस अधिकारी व अंमलदारांना प्रजासत्ताक दिनानिमित्त शासनाकडून सन्मानित केले जात असते. यावर्षी सुद्धा आज दिनांक 25 जानेवारी 2026 रोजी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंधेला मा. महामहीम राष्ट्रपती यांचे संपूर्ण देशभरात एकुण 121 पोलीस शौर्य पदक जाहिर झाले असून, त्यापैकी गडचिरोली पोलीस दलास 31 पोलीस शौर्य पदक जाहिर झाले आहेत. तसेच सन 2025 मध्ये स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंधेला 07 पोलीस अधिकारी व अंमलदार यांना मा. राष्ट्रपती यांचे पोलीस शौर्य पदक प्राप्त झाले होते. यावर्षी सन 2026 मध्ये एकुण 31 पोलीस अधिकारी/अंमलदार यांना मा. राष्ट्रपती यांचे पोलीस शौर्य पदक जाहिर झाले असून मागील पाच वर्षात गडचिरोली पोलीस दलास एकुण 03 शौर्य चक्र, 217 पोलीस शौर्य पदक प्राप्त झाले आहे.

पोलीस शौर्य पदक प्राप्त अधिकारी व अंमलदार 1) पोनि. श्री. अमोल फडतरे, 2) पोउपनि. मधुकर पोचय्या नैताम, 3) पोउपनि. वासुदेव राजम मडावी, 4) सफौ/विलास मारोती पोरतेट 5) पोहवा/संतोष वसंत नैताम, 6) पोहवा/विश्वनाथ सन्यासी सडमेक, 7) पोहवा/ज्ञानेश्वर सदाशिव तोरे, 8) पोहवा/दिलीप वासुदेव सडमेक, 9) पोहवा/रामसू देऊ नरोटे, 10) पोहवा/आनंदराव बाजीराव उसेंडी, 11) पोहवा/राजु पंडीत चव्हाण, 12) पोहवा/मोहन लच्छु उसेंडी, 13) पोहवा/संदिप गणपत वसाके, 14) पोना/अरुण कैलास मेश्राम, 15) पोना/सुधाकर बिटोजी वेलादी, 16) पोना/नितेश गंगाराम वेलादी, 17) पोना/विश्वनाथ लक्ष्मण मडावी 18) पोना/कैलास देवू कोवासे, 19) पोना/हरीदास महारु कुलयेटी, 20) पोना/किशोर चंटी तलांडे, 21) पोना/अतुल भगवान मडावी, 22) पोना/अनिल रघुपती आलाम, 23) पोना/नरेंद्र दशरथ मडावी, 24) पोना/आकाश अशोक ऊईके, 25) पोना/घिस्सु वंजा आत्राम, 26) पोना/राजु मासा पुसाली, 27) पोना/महेश दत्तुजी जाकेवार, 28) पोना/रुपेश रमेश कोडापे, 29) पोना/मुकेश शंकर सडमेक, 30) पोना/योगेंद्रराव उपेंद्रराव सडमेक, 31) पोअं/कारे ईरपा आत्राम यांना पोलीस शौर्य पदक मिळाले आहे. दिनांक 22 एप्रिल 2018 रोजी मौजा बोरीया-कसनासूर येथे झालेल्या पोलीस व माओवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एकूण 40 माओवाद्यांना कंठस्नान घालण्यास गडचिरोली पोलीस दलास यश प्राप्त झाले होते. वरील सर्व अधिकारी व अंमलदार यांनी सदरच्या चकमकीमध्ये केलेल्या यशस्वी कामगिरीची दखल घेऊन मा. राष्ट्रपती यांचे पोलीस शौर्य पदक जाहिर झाले आहे.
यासोबतच गडचिरोली पोलीस दलातील एकूण 394 पोलीस अंमलदारांना पदोन्नती मिळाली असून त्यापैकी एकूण 10 पोलीस अंमलदारांना वेगवर्धित पदोन्नती तसेच 14 शहीद पोलीस अंमलदारांना देखील पदोन्नती मिळाली आहे. यामध्ये एकूण 82 पोलीस हवालदार यांना सहाय्यक पोलीस उप-निरीक्षक पदी पदोन्नती मिळाली असून 09 पोलीस हवालदार यांना वेगवर्धित पद्धतीने पदोन्नती मिळाली आहे. तसेच एकूण 302 पोलीस नाईक यांना पोलीस हवालदार पदी मिळाली असून 01 पोलीस नाईक यांना वेगवर्धित पदोन्नती मिळाली आहे. यासोबतच 07 शहीद पोलीस हवालदार यांना सहा. पोलीस उप-निरीक्षक पदी व 07 शहीद पोलीस नाईक यांना पोलीस हवालदार पदी पदोन्नती देण्यात आली आहे.
यावेळी राष्ट्रपती पोलीस शौर्य पदक प्राप्त पोलीस अधिकारी व अंमलदार तसेच पदोन्नती प्राप्त पोलीस अंमलदार यांचे गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक अहेरी श्री. कार्तिक मधीरा व अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. गोकुल राज जी. यांनी कौतुक केले आहे व त्यांच्या पुढील सेवेकरीता शुभेच्छा दिल्या आहेत.

सीआरपीएफ के वीर उप महानिरीक्षक श्री प्रशांत जाम्भोलकर को राष्ट्रपति पुलिस पदक से सम्मानित, राष्ट्रव्यापी प्रशंसा के बीच

श्रीनगर, 25 जनवरी 2026: भारत की सबसे कठिन सुरक्षा चुनौतियों पर अद्वितीय वीरता, अटूट समर्पण और उत्कृष्ट सेवा के सम्मान में, श्रीनगर में केंद्रीय रिजर्व पुलिस बल (सीआरपीएफ) में सेवारत श्री प्रशांत जाम्भोलकर को प्रतिष्ठित राष्ट्रपति पुलिस पदक से नवाजा गया है। यह सर्वोच्च सम्मान उनके जीवन भर के बलिदानों और राष्ट्र की रक्षा में साहसिक नेतृत्व को चिह्नित करता है।
वीरता और सम्मानों की विरासत
श्री जाम्भोलकर का शानदार करियर जम्मू एवं कश्मीर, उत्तर पूर्व, छत्तीसगढ़ आदि में महत्वपूर्ण अभियानों से भरा पड़ा है। एलीट नेशनल सिक्योरिटी गार्ड (एनएसजी)—प्रसिद्ध ब्लैक कैट कमांडो—के एक प्रमुख सदस्य के रूप में, वे रैपिड एक्शन फोर्स (आरएएफ), कोबरा बटालियन और कोसोवो में संयुक्त राष्ट्र शांति स्थापना मिशन में चमके हैं। उनकी वीरता ने उन्हें पुलिस पदक (उत्कृष्ट सेवा), कठिन सेवा पदक, अंटार्कटिक सुरक्षा पदक, संयुक्त राष्ट्र शांति स्थापना पदक सहित अनेक सम्मान अर्जित कराए हैं, जो इस शिखर राष्ट्रपति पुरस्कार पर मुहर लगाते हैं।
सीआरपीएफ में अपनी फ्रंटलाइन साहस, अखंडता और नवीन रणनीतियों के लिए “स्पेशल ऑफिसर” के नाम से विख्यात श्री जाम्भोलकर अपने सभी सहयोगियों को प्रेरित करते हैं।
बधाइयों और स्वागत की भारी बौछार
इस घोषणा ने सीआरपीएफ भाईचारे, सुरक्षा बलों, पूर्व सैनिकों और पूरे भारत के नागरिकों से हार्दिक बधाइयों का सैलाब ला दिया है। सोशल मीडिया और आधिकारिक चैनलों पर “हमारे राष्ट्रीय नायक को हार्दिक बधाई!” और “हर भारतीय के लिए गौरव का क्षण—वीरों के पंथ में स्वागत!” जैसे संदेश उमड़ पड़े हैं। यह उत्साह राष्ट्र की उनकी अजेय भावना के प्रति कृतज्ञता को दर्शाता है। सीआरपीएफ परिवार श्री जाम्भोलकर उप महानिरीक्षक को गर्व से बधाई देता है, निश्चिंत कि उनकी उत्कृष्ट सेवा राष्ट्रीय सुरक्षा को और मजबूत करती रहेगी।