गुनाहो का अंत....!

ऑनलाइन लॉटरीवर छापा; दोन आरोपी अटकेत, 2.93 लाखांचा मुद्देमाल जप्त!

ऑनलाइन लॉटरीवर छापा; दोन आरोपी अटकेत, 2.93 लाखांचा मुद्देमाल जप्त!

क्राईम ऑपेरेशन -9 जुन 2026

नागपूर, : गुन्हेशाखा के क्राईम युनिट-3 ने शांतीनगर पोलीस ठाणे हद्दीतील लालगंज परिसरातील चकना चौक येथे ऑनलाइन लॉटरी व सट्टा व्यवसायावर कारवाई करत दोन आरोपींना ताब्यात घेतले. या कारवाईत 2 लाख 93 हजार 740 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी लोकांकडून पैसे स्वीकारून शासनबंदीत ऑनलाइन लॉटरीवर सट्टा लावत होते. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे गुन्हेशाखा क्राईम युनिट-3 ने छापा टाकून ही कारवाई केली.

या प्रकरणात सचिन दिलीप रहागडाले (वय 21, रा. नवीन नगर, पारडी) आणि अनिकेत मोरेश्वर वकालकार (वय 21, रा. नवीन नगर, पारडी) यांना अटक करण्यात आली आहे. तर सागर लीलाधर धनंजोडे हा आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे.

कारवाईदरम्यान पोलिसांनी 4 संगणक, 4 सीपीयू, 7 गेमिंग मशीन, 2 स्लिप मशीन, राऊटर, खुर्च्या, की-बोर्ड, कॅल्क्युलेटर, 2 मोबाईल फोन तसेच 1 हजार 830 रुपये रोख रक्कम असा एकूण 2 लाख 93 हजार 740 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

याप्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक 121/26 नोंदविण्यात आला असून महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याच्या कलम 4 व 5 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास शांतीनगर पोलीस करीत आहेत.