गुनाहो का अंत....!

Breaking
वेटनरी चौक पर पुलिस कार्रवाई के बाद भी बेखौफ सट्टा कारोबार जारी! • हजारी पहाड़ के सट्टा नेटवर्क में पुलिसकर्मी की भूमिका की चर्चा, निष्पक्ष जांच की मांगसमृद्धी महामार्गावर एमडी ड्रग्सचा मोठा साठा जप्त! मुंबईहून नागपूरकडे येणारे दोघे जेरबंद; ११ लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल हस्तगतऑनलाइन लॉटरीवर छापा; दोन आरोपी अटकेत, 2.93 लाखांचा मुद्देमाल जप्त!महिला मित्र की दगाबाजी से खुला करोड़ों के ड्रग्स का राज! प्रेम, धोखा और 7.5 किलो एमडी का काला कारोबारसात किलो एमडी ड्रग्स जब्त, तस्कर गिरफ्तार! उप्पलवाड़ी के फ्लैट को बना रखा था ‘धंधे’ का अड्डा 6.80 करोड़ की खेप ने उड़ाए पुलिस के होश

समृद्धी महामार्गावर एमडी ड्रग्सचा मोठा साठा जप्त! मुंबईहून नागपूरकडे येणारे दोघे जेरबंद; ११ लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल हस्तगत

समृद्धी महामार्गावर एमडी ड्रग्सचा मोठा साठा जप्त!
मुंबईहून नागपूरकडे येणारे दोघे जेरबंद; ११ लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल हस्तगत

क्राइम ऑपरेशन | हिंगणा | ११ जून २०२६

नागपूर शहरातील अमली पदार्थांच्या वाढत्या तस्करीविरोधात गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने मोठी कारवाई करत समृद्धी महामार्गावरील वायफळ टोल नाक्याजवळ दोन आरोपींना अटक केली. या कारवाईत ११३.१९० ग्रॅम एमडी (मेफेड्रोन) ड्रग्स जप्त करण्यात आले असून त्याची अंदाजे किंमत ११ लाख २१ हजार ९०० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये सय्यद शहबाज कुरेशी (२०) आणि शकील अहमद अब्दुल खालिद (३५) यांचा समावेश आहे. प्राथमिक तपासात हे दोघे मुंबईतील कुर्ला परिसरातून ‘डिश’ नावाच्या व्यक्तीकडून एमडी ड्रग्स घेऊन ट्रॅव्हल्स वाहनाने नागपूरकडे येत असल्याची माहिती समोर आली आहे.
गुप्त माहितीच्या आधारे सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने समृद्धी महामार्गावरील वायफळ टोल नाक्याजवळ सापळा रचला. संशयितांची झडती घेतली असता त्यांच्याकडून एमडी ड्रग्सचा साठा आढळून आला. पोलिसांनी ड्रग्ससह तीन मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा एकूण ११ लाख ५७ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणी हिंगणा पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्याच्या कलम ८(क), २२(क) व २९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, मुंबईतील कथित पुरवठादाराचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरविली असून या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचाही तपास सुरू आहे.

गुन्हेशाखेची अमली पदार्थांविरोधातील धडक मोहीम
नागपूर शहरात अमली पदार्थांच्या तस्करीला आळा घालण्यासाठी गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाकडून सातत्याने कारवाया केल्या जात आहेत. समृद्धी महामार्गाचा वापर करून अमली पदार्थांची वाहतूक करणाऱ्या तस्करांवर ही कारवाई मोठा धक्का मानली जात आहे.