गुनाहो का अंत....!

गांजा विकना-र्या महिलेवर कोतवाली पुलिसांनी केली कारवाई

गांजा विकना-र्या महिलेवर कोतवाली पुलिसांनी केली कारवाई

क्राइम ऑपरेशन-8 मे 2026

नागपूर : कोतवाली पोलीस ठाणे हद्दीत एन.डी.पी.एस. अॅक्ट अंतर्गत कारवाई करत पोलिसांनी एका महिलेकडून गांजा जप्त केला आहे. ही कारवाई मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आली.

माहितीनुसार, दि. 07 मे 2026 रोजी उद्योगी नगर, सर्कल नं. 06, महाल परिसरात एका महिलेच्या संशयास्पद हालचाली सुरू असल्याची माहिती कोतवाली पोलिसांना प्राप्त झाली होती. त्यानुसार पोलिस पथकाने घटनास्थळी जाऊन पंचांसमक्ष कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत झडती घेतली.

या झडतीदरम्यान आरोपी चांदबानो मोहम्मद हातम (वय 60 वर्ष) हिच्या ताब्यातून 648 ग्रॅम गांजा, किंमत अंदाजे 12 हजार रुपये, नगदी 580 रुपये तसेच इतर साहित्य असा एकूण 12 हजार 580 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक 80/2026 अन्वये एन.डी.पी.एस. अॅक्ट 1985 अंतर्गत कलम 8(क), 20(ब)(ii)(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

सदर कारवाई पोहवा. प्रसन्न दापुकर (बकल नं. 5582) यांच्या फिर्यादीवरून करण्यात आली असून गुन्हा PSI राठोड यांनी दाखल केला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलीस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई यशस्वीरित्या पार पाडली.